ऑगस्ट ते सप्टेंबर पाऊस

ऑगस्ट ते सप्टेंबर पाऊस

 

Pune News : राज्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा  पाऊस राहू शकतो. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरी पाऊस पडू शकतो. मात्र पुढील दोन महिन्यांमध्ये म्हणेजच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहू शकतो, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र हवामान विभागाने दिला.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी माॅन्सून हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा अंदाज आज (ता.१) जाहीर केला. त्यांनी सांगितले की जून आणि जुलै महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा १.८ टक्के जास्त होते.

5 Yogaposes for Backpain in Marathi : ही 5 योगासने आहेत पाठदुखीसाठी वरदान

ऑगस्ट ते सप्टेंबर पाऊस

 

Also read:

Maharashtra Rain Alert : कोकण, घाटमाथा अन् विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’

तर दक्षिण भारतात सरासरीपेक्षा १८.४ टक्के पाऊस पडला. पूर्व आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा १८.९ टक्के कमी पाऊस झाला तसेच मध्य भारतात पावसाचे प्रमाणे सरासरीपेक्षा १६.८ टक्क्यांनी जास्त होते. दक्षिण भारतात पाऊस सरासरीपेक्षा २६.७ टक्क्यांनी अधिक झाला.

 

Also read:

Maharashtra Rain : राज्यातील धरणांतून विसर्ग सुरूच

ऑगस्ट आणि सप्टेंबरचा अंदाज

 

या शेतकऱ्याचे होणार कर्ज माफ येते क्लिक करा

 

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज जाहीर केला. देशाच्या बहुतांशी भागात या दोन्ही महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पाहील. मात्र ईशान्य आणि शेजारच्या पूर्व भार, लडाख, सौराष्ट्र आणि कच्छ तसेच मध्य भारतातच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील अंदाज दिला.

ऑगस्टमध्ये खंड पडणार?

हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यात देशात सरासरी पाऊस पडेल, अशा अंदाज दिला. मात्र देशातील अनेक भागात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील असेही संकेत दिले. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील अनेक भागात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याचा अंदाज आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरी पाऊस पडेल, असा अंदाजही हवामान विभागाने दिला.

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला असेच हवामान अंदाज शेती विषयी माहिती बघण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा माहिती आवडल्यास पुढे शेअर करा.

ऑगस्ट ते सप्टेंबर सर्व पाऊस अंदाज बघण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *