Ek shetkari Ek DP youjana एक शेतकरी एक डीपी योजना

एक शेतकरी एक डीपी योजना

Ek shetkari Ek Dp youjna (एक शेतकरी एक डीपी योजना)

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील एक नवीन योजना एक शेतकरी एक डीपी योजना. या योजनेचे माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा करण्यात येणार आहे.

एक शेतकरी एक डीपी यासाठी लागणारे कागदपत्रे व अटी बघूया.

One farmer one transformer: शासनाने वीज चोरी थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आणि यासाठी सरकारने एक शेतकरी एक डीपी ह्या योजनेचा निर्णय घेतला आहे.

आणि राज्यातील शेतकऱ्यांना वीज पुरवठा कमी पडू नये म्हणून अखंडीत वीज पुरवठा पुरवण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. या योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःची स्वातंत्र्य डीपी दिली जाते. आणि प्रत्येकी शेतकऱ्याला आपला स्वहिस्सा भरावा लागतो.

एक शेतकरी एक डीपी योजना पहा संपूर्ण माहिती

 

एक शेतकरी एक डीपी योजना यासाठी शेतकऱ्याला किती पैसे भरावे लागतात .

शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रवर्गातून वेगवेगळी रक्कम भरावी लागते. अनुसूचित जमाती अनुसूचित जाती या प्रवर्गाला तील शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 पाच हजार रुपये भरावे लागतात. आणि जे सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकरी आहे त्यांना प्रति एचपी 7 सात हजार रुपये भरावे लागतात.

आणि ही रक्कम त्या शेतकऱ्यांसाठी लागू होते ज्यांच्याकडे दोन हेक्टर जमीन आहे. आणि ज्या शेतकऱ्याकडे दोन हेक्टर पेक्षा अधिक जमीन आहे त्या शेतकऱ्यांना प्रति एचपी 11 अकरा हजार रुपये भरावे लागतात.

या योजनेसाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे

  1. जातीचा दाखला
  2. बँक पासबुक झेरॉक्स
  3. जमिनीचा 8अ उतारा
  4. जमिनीचा 7/12 उतारा
  5. आधार कार्ड झेरॉक्स
  6. पॅन कार्ड झेरॉक्स
  7. विज बिल

या योजनेसाठी हे सर्व डॉक्युमेंट लागतात.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लाभार्थी आहेत त्यांची संख्या.

अर्ज कुठे करावा ?

तुम्हाला एक डीपी एक शेतकरी या योजने चा अर्ज करण्यासाठी महावितरणच्या वेबसाईट वरती भेट द्यावी लागेल.यासाठी येथे क्लिक करा 

शेती विषयी नवीन अपडेट व हवामान अंदाज बाजार भाव, सरकारी योजना, तेही बिलकुल फ्री फ्री जाणून घेण्यासाठी  व्हाट्सअप  ग्रुपला नक्की जॉईन करा.

 

युरिया आणि डीपी बाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय हा सविस्तर माहिती

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *